सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतेय - राहुल गांधी
By Admin | Updated: December 8, 2015 15:54 IST2015-12-08T15:54:53+5:302015-12-08T15:54:53+5:30
भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतेय - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ८ - नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. भाजप सरकार सूडबुद्धीने वागले तरी, मी थांबणार नाही. मी सरकारला प्रश्न विचारुन दबाव निर्माण करण्याचे काम चालूच ठेवणार असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या आधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीही मी इंदिरा गांधींची सून असून, कोणालाही घाबरणार नाही असे म्हटले होते. राजकीय सूडबुद्धीची पध्दत अवलंबून ते मला रोखू शकतात असे त्यांना वाटते. पण असे घडणार नाही असे राहुल म्हणाले. ते चन्नईमधल्या पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.