शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी सरकार वचनबद्ध; संसदेत विरोधकांच्या गदारोळानंतर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:51 IST

एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने संसदेच्या सभागृहात देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने संसदेच्या सभागृहात देण्यात आली. त्या आधी नेमणुका व पदोन्नतीमध्ये एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्ये बांधील नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरले. या प्रश्नावरून लोकसभेत गदारोळ झाला.लोकसभेचे कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. द्रमुक सदस्यांनी सरकारवर निशाणा साधला. उत्तराखंड सरकारकडून न्यायालयात बाजू मांडल्यानंतर हा निर्णय आला आहे. बसपचे रितेश पांडे म्हणाले की, सरकार दलितविरोधी आहे. राज्यघटनेने आरक्षणाचा अधिकार दिला आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, एससी, एसटी आणि ओबीसी यांना संविधानाने हा अधिकार दिला आहे. न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे.लोजपाचे चिराग पासवान म्हणाले की, आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे. याबाबत सरकारला हस्तक्षेप करायला हवा. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, न्यायालयाने निर्णय बदलावा, यासाठी सत्ताधारी पक्षाने लवकर पावले उचलावीत.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या संवेदनशील मुद्द्यावर विरोधक राजकारण करत आहेत. दोन्ही सभागृहांत निवेदन करताना सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहेलोत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा हा निर्णय २०१२ मधील काँग्रेस सरकारच्या काळातील प्रकरणाशी संबंधित आहे. राज्यसभेत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, न्यायालयाचा निर्णय अन्यायकारक आहे. मात्र, एससी, एसटी यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी मोदी सरकार बांधील आहे.आरक्षण संपविणे हा भाजपचा डाव : राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले की, आरक्षण समाप्त करण्याची इच्छा बाळगणे हे भाजप आणि आरएसएसच्या डीएनएमध्येच आहे. वंचित वर्गाचे अधिकार हिसकावण्यासाठी हे षड्यंत्र आखले जात आहे. मात्र, एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण काँग्रेस समाप्त होऊ देणार नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभाreservationआरक्षण