सरकारी कॅलेंडर आता मोबाईल अॅपच्या रूपात
By Admin | Updated: December 15, 2014 03:06 IST2014-12-15T03:06:58+5:302014-12-15T03:06:58+5:30
माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दरवर्षी प्रकाशित केली जाणारी सरकारी कालदर्शिका अर्थात कॅलेंडर यावर्षी प्रथमच मोबाईल अॅपच्या रूपात येण्याची शक्यता आहे़

सरकारी कॅलेंडर आता मोबाईल अॅपच्या रूपात
नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दरवर्षी प्रकाशित केली जाणारी सरकारी कालदर्शिका अर्थात कॅलेंडर यावर्षी प्रथमच मोबाईल अॅपच्या रूपात येण्याची शक्यता आहे़
‘स्वच्छ हिरवा भारत’ या थीमवरील प्रमुख सरकारी योजना आणि प्रयत्न दर्शविणाऱ्या या कॅलेंडरचे येत्या काही दिवसांत प्रकाशन होत आहे़ एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक डिजिटल कॅलेंडर वा एक नि:शुल्क अॅप बनविण्यासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राशी (एनआयसी) संपर्क करण्यात आला आहे़ जेणेकरून स्मार्टफोनधारक विशेषत: युवावर्ग याचा लाभ घेऊ शकतील़ अॅप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ संबंधित अॅपमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयासारख्या काही महत्त्वपूर्ण संकेतस्थळाच्या लिंकही दिल्या जातील़