प्राण्यांपासून साबण, डिटर्जंट बनवण्यावर सरकारकडून बंदी- पेटा
By Admin | Updated: April 18, 2016 21:28 IST2016-04-18T21:28:42+5:302016-04-18T21:28:42+5:30
प्राण्यांच्या अवयवांपासून साबण आणि डिटर्जंट बनवणा-या कंपन्यांवर 'सीपीसीएसइए'नं बंदी घातली आहे.

प्राण्यांपासून साबण, डिटर्जंट बनवण्यावर सरकारकडून बंदी- पेटा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८- प्राण्यांच्या अवयवांपासून साबण आणि डिटर्जंट बनवणा-या कंपन्यांवर 'सीपीसीएसइए'नं बंदी घातली आहे. पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येणा-या आणि जनावरांवर प्रयोग करणा-यांवर देखरेख ठेवणा-या समिती (सीपीसीएसइए)नं ही बंदी घातली असून, यासाठी सर्क्युलरही जारी केल्याचं पेटानं सांगितलं आहे.
पेटा या संघटनेला माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. हे सर्क्युलर जनावरांच्या अवयव आणि चरबीपासून साबण आणि डिटर्जंट बनवणारे उत्पादक आणि उद्योजकांना पाठवण्यात आलं आहे. 2014पासून प्राण्यांपासून साबण बनवण्यावर बंदी घालण्याचा विचार होता, असंही यावेळी पेटानं सांगितलं. प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणा-या बीआयएस या संघटनेनं प्राण्यांच्या अवयवांवर प्रयोग करण्यावर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि काही खासदारांनीही यासाठी मदत केली होती. आता साबण उत्पादकांना ससा, उंदीर आणि डुकराचे अवयव, चरबी वापरून साबण बनवता येणार नाही आहे.
पेटानं स्वतःच्या वेबसाईटवर प्राण्यांच्या चरबीविरहित साबणांच्या कंपन्यांची माहिती दिली आहे, असं पेटाची रिसर्च असोसिएट दीप्ती कपूर यांनी सांगितलं आहे. पेटाच्या माहितीनुसार, जगात प्राण्यांच्या अवयवांपासून साबण बनवणा-या 2 हजार कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता प्राण्यांच्या अवयवांपासून न बनवलेला साबण वापरता येणार आहेत.