शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्यापूर्वीच ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट; ७८ दिवसांचा पगार बोनस देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 12:13 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठलं आहे.

नवी दिल्ली - देशात सध्या सण, उत्सावाचा माहोल आहे. त्यात केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच मोठी भेट दिली आहे. रेल्वेने अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना (RPF/RPSF कर्मचारी वगळता) ७८ दिवसांच्या पगाराच्या समान बोनस देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच ही रक्कम खात्यात जमा होणार आहे. रेल्वे दरवर्षी दसरा/पूजेपूर्वी कर्मचाऱ्यांना PLB देते.

कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यासाठी रेल्वेवर १८३२.०९ कोटी इतका बोजा पडणार आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा ७००० रुपये दिले जातात. ७८ दिवसांनुसार कर्मचार्‍यांना बोनस म्हणून रु १७,९५१ दिले जातील. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात रेल्वेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही रेल्वेने अनेक आर्थिक लक्ष्य गाठलं आहे. २०२१ मध्ये माल वाहतुकीत १८४ मिलियन टनापर्यंत वाढ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस प्रोत्साहन कामासाठी दिले जाते. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांची वाढअलीकडेच सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट कमेटी ऑफ इकोनॉमिक अफेयर्सची (CCEA) बैठक आज पार पडली. याच बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती.

३४ वरुन ३८ टक्के झाला महागाई भत्तासरकारनं याआधी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती. १ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांरुन ३४ टक्के इतका झाला होता. आता यात पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएची टक्केवारी ३८ टक्के इतकी झाली आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावर होणार आहे.  सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :railwayरेल्वे