ठरलं! सिद्धू अमृतसरमधून लढवणार निवडणूक
By Admin | Updated: January 4, 2017 16:09 IST2017-01-04T16:09:28+5:302017-01-04T16:09:28+5:30
गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या अधांतरी लटकलेल्या नवज्योत सिंग सिद्धूच्या राजकीय वाटचालीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे.

ठरलं! सिद्धू अमृतसरमधून लढवणार निवडणूक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या अधांतरी लटकलेल्या नवज्योत सिंग सिद्धूच्या राजकीय वाटचालीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे. सिद्धू पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर अमृतसर येथून निवडणूक लढवणार आहे.
भाजपल रामराम ठोकून स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सिद्धूने वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्याला अपयश आले होते. त्यानंतर तो आपमध्ये प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये याचीही चर्चा रंगली होती. अखेर काही दिवसांपूर्वीच सिद्धू काँग्रेसच्या हातात हात देणार हे निश्चित झाले. आता सिद्धृची पत्नी नवज्योत कौर हिने आज सिद्धू अमृतसर पूर्व मतदार संघामधून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. या मतदार संघातून सिद्धूची पत्नी नवज्योत कौर आमदार होती.
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात 4 तारखेला होणार असून, 11 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.