गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कट नाही - सीबीआयचा निर्वाळा
By Admin | Updated: October 7, 2014 19:14 IST2014-10-07T19:14:23+5:302014-10-07T19:14:23+5:30
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही कट कारस्थान अथवा घातपात नसल्याचा निर्वाळा मंगळवारी सीबीआयकडून देण्यात आला.

गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कट नाही - सीबीआयचा निर्वाळा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही कट कारस्थान अथवा घातपात नसल्याचा निर्वाळा मंगळवारी सीबीआयकडून देण्यात आला. मुंडे यांचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात असल्याचा आरोप करीत अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली होती.
बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मोदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय ग्रामविकासमंत्रीपद मिळालेल्या मुंडे यांचे काही दिवसातच दिल्लीत सकाळी विमानतळाकडे जात असताना अपघाती निधन झाले होते. परंतू हे अपघाती निधन नसून त्यांचा घातपाती मृत्यू घडवून आणल्याचे अनेकांना वाटत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा विषय चांगलाच चर्चेला आला होता. धनंजय मुंडे यांनी तर चौकशी करा अन्यथा दिल्लीला येवून उपोषणाला बसेन असा इशारा दिला होता. तर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे कोणीही राजकारण करू नये तसेच सीबीआयला त्यांचे काम करू द्यावे असे मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. सीबीआयच्या निर्वाळानंतर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.