गोपाळ देवकर यांची सभापतीपदी निवड बिनविरोध : जिल्हा मजूर फेडरेशन उपसभापतीपदी प्रकाश पाटील
By Admin | Updated: February 10, 2016 00:30 IST2016-02-10T00:30:49+5:302016-02-10T00:30:49+5:30
जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी बैठक झाली. सभेत जि.प.सदस्य गोपाळ देवकर यांची सभापतीपदी तर प्रकाश एकनाथ पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

गोपाळ देवकर यांची सभापतीपदी निवड बिनविरोध : जिल्हा मजूर फेडरेशन उपसभापतीपदी प्रकाश पाटील
ज गाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी बैठक झाली. सभेत जि.प.सदस्य गोपाळ देवकर यांची सभापतीपदी तर प्रकाश एकनाथ पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.महाराष्ट्र सहकारी संस्थातील तरतुदीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाडवी यांनी सभापती व उपसभापती निवडीसाठी मंगळवारी संचालक मंडळाची सभा बोलविली होती. यात सभापतीपदासाठी गोपाळ देवकर यांचा तर उपसभापतीपदासाठी पाचोरा येथील प्रकाश पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पदाधिकारी निवडीच्या सभेला नवनिर्वाचित संचालक बळीरामदादा सोनवणे, लीलाधर तायडे, अशोक महाजन, रोहिदास पाटील, राजेंद्र कोलते, भगवान पाटील, अजय पाटील, एकनाथ पाटील, मधुकर पाटील, ईश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, वाल्मिक पाटील, समीर पाटील, बाबूराव घोंगडे, घन:श्याम खैरनार, भानुमती रमेश पाटील, जयश्री धिरेंद्र पाटील तसेच संस्था प्रतिनिधी अजय सोनवणे, आर.डी.पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, संजय येवले, भाग्येश ढाकणे, संजय पाटील, धिरेंद्र पाटील, रमेश शिंदे, मिलिंद सोनवणे, चुनीलाल पाटील, डी.डी.पाटील उपस्थित होते.