गुगलच्या माजी अभियंत्याला अटक
By Admin | Updated: October 30, 2014 00:38 IST2014-10-30T00:38:50+5:302014-10-30T00:38:50+5:30
इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरियाला (इसिस) सामील होण्याच्या प्रयत्नात असलेल्या व गुगलचा माजी कर्मचारी असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुगलच्या माजी अभियंत्याला अटक
समज देऊन सोडले : इसिसमध्ये सामील होण्याची होती इच्छा
हैदराबाद : इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरियाला (इसिस) सामील होण्याच्या प्रयत्नात असलेल्या व गुगलचा माजी कर्मचारी असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या मुनव्वर सलमान हा युवक इसिसकडे आकर्षित झाला होता व त्याला त्या संघटनेत सहभागी व्हायचे होते असे एका वरिष्ठ पोलीस अधिका:यांनी सांगितले.
गुगलच्या हैदराबाद येथील कार्यालयात काम केलेल्या सलमानने सात महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडली होती. तो सौदी अरेबियाचा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कळल्यावर त्याला अटक करण्यात आली. तेथून तो इराकला जाण्याचा विचारात होता. त्याने मागील सहा महिने इसिसचा अभ्यास केला होता व त्याला त्या संघटनेत सामील व्हायचे होते.
याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून त्याला समज देऊन सोडण्यात आल्याचे या अधिका:यांनी सांगितले. आतार्पयत चार युवकांना इसिसमध्ये सहभागी होण्यापासून पोलिसांनी परावृत्त केल्याचे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)