शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलीस घेताहेत शोध, हे आहे कारण

By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 08:14 IST

FIR against Google's CEO Sundar Pichai : एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १८ जणांमध्ये एक नाव असे आहे ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. हे नाव आहे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे.

ठळक मुद्देही एफआयआर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहेवारासणीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी ही एफआयआर नोंदवली आहे १८ जणांमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यासह गुगलच्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेली एक एफआयआर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १८ जणांमध्ये एक नाव असे आहे ज्याची सर्वाधिक चर्चा आहे. हे नाव आहे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही एफआयआर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहे. वारासणीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी ही एफआयआर नोंदवली आहे. गिरिजा शंकर यांचा आरोप आहे की व्हॉट्स अ‍ॅपच्या एका ग्रुपवर एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी त्या क्रमांकावर फोन करून व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर यूट्युबवर एक व्हिडीओ अपलोड केला गेला. ज्यामध्ये कथितपणे गिरिजा शंकर यांचा मोबाईल क्रमांक शेअर करण्यात आला. तेव्हापासून गिरीजा शंकर यांना धमक्या देणारे फोन येत आहेत.गिरीजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक यूट्युबवर अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव विशाल सिंह आहे. त्याने यूट्युबवर एक व्हिडिओ तयार केला आणि गिरिजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक त्या व्हिडीओमध्ये टाकून या व्यक्तीपासून आपल्याला धोका असल्याचे एक गाणे तयार केले. तेव्हापासून गिरिजा शंकर यांना सुमारे ८ हजार ५०० धमकीचे फोन आले आहेत. यामधून जीवे मारण्याची धमकी आणि शिविगाळ केली जात आहे.त्यानंतर गिरिजा शंकर यांनी या प्रकरणी न्यायालयात कलम १५६ अंतर्गत विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने भेलूपूर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करून तपासाचे आदेश दिले. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी भेलूपूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या १८ जणांमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यासह गुगलच्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर आय़टी अ‍ॅक्ट आणि कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईgoogleगुगलVaranasiवाराणसीPoliceपोलिस