‘गुगल’ उपाध्यक्षांनी मोडला ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम

By Admin | Updated: October 26, 2014 02:04 IST2014-10-26T02:04:08+5:302014-10-26T02:04:08+5:30

प्रेसिडेन्ट अॅलन युस्टेस यांनी वयाच्या 57 व्या वर्षी आकाशातून सर्वाधिक उंचीवरून पृथ्वीवर उडी घेत ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम मोडीत काढला.

'Google vice president' broke the record of 'skydiving' | ‘गुगल’ उपाध्यक्षांनी मोडला ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम

‘गुगल’ उपाध्यक्षांनी मोडला ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम

वॉशिंग्टन : दुर्दम्य इच्छा, आत्मविश्वास आणि निश्चयाचे पाठबळ सोबत असले की, काहीही अशक्य नाही. ‘गुगल’चे व्हाईस प्रेसिडेन्ट अॅलन युस्टेस यांनी वयाच्या 57 व्या वर्षी उपरोक्त उपजत शक्तीच्या बळावर आकाशातून सर्वाधिक उंचीवरून पृथ्वीवर उडी घेत ऑस्ट्रेलियाच्या फेलिक्स बौमगार्टनर याचा 2012 मधील ‘स्कायडायव्हिंग’चा विक्रम मोडीत काढला.
हेलियमयुक्त महाकाय फुग्यात  बसून  युस्टेस यांनी न्यू मेक्सिकोतील रोजवेल धावपट्टीवरून आकाशी भरारी घेतली. दोन तासांत हे वातयान (वायूने भरलेले  फुगायुक्तयान) 16क्क् फूट प्रति मिनिट वेगाने पृथ्वीपासून 4क् किलोमीटर दूर स्थितांबरात          पोहोचले.  या वातयानात युस्टेस यांच्यासोबत विशेष स्पेससूट होते. पृथ्वीपासून 135,89क् फुटावर पोहोचल्यानंतर छोटय़ाशा स्फोटाने वातयानापासून स्वत:ला अलग करीत युस्टेस यांनी थेट पृथ्वीवर सूर मारला. एवढेच नाही तर त्यांनी बौमगार्टनरचा 128,क्क्क् फुटावरून उडी                   मारण्याचा दोन वर्षापूर्वीचा विक्रमही मोडीत काढला, असे वर्ल्ड एअर  स्पोर्टस् फेडरेशनने घोषित केले.  (वृत्तसंस्था)
 
1 शुक्रवारी सकाळी युस्टेस यांनी न्यू मेक्सिकोतील रोजवेल या बंद असलेल्या हवाईपट्टीवरून वातयानासह आकाशात भरारी घेतली. 
 
2 पृथ्वीपासून 1क्क्,क्क्क् फूट उंचीवरील वातावरणाचा वेध घेण्याच्या उद्देशातहत पॅरागॉन स्पेस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ही मोहीम आयोजित केली होती.
 
3  या संस्थेने युस्टेससाठी स्वयंपूर्ण असा खास स्पेस सूट तयार केला होता. वातयान तंत्रज्ञानाच्या (बलून टेक्नॉलॉजी) साह्याने अॅलन युस्टेस यांना पृथ्वीपासून मोठय़ा उंचीवर नेण्यात आले.
 
अनुभव अद्भुत
‘‘ हा अनुभव अद्भुत होता. अंतराळातील दाट अंधार आणि वातावरणातील प्रत्येक स्तर स्पष्ट पाहू शकतो, असे विलोभनीय दृश्य मी आजवर पाहिले नव्हते. या अवधीत मला ध्वनी गजर्ना जाणवली नाही आणि ऐकूही आली नाही, असे अॅलन युस्टेस यांनी सांगितले.

 

Web Title: 'Google vice president' broke the record of 'skydiving'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.