शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलकडूनच 'गलती से मिस्टेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 8:32 AM

लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर अचानक सेव्ह झाल्याचे निदर्शनास आले, यावर गुगलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नवी दिल्ली -  देशभरातील लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी (3 ऑगस्ट) आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947  UIDAI या नावानं आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे अनेकांना धक्का बसला. आपण स्वतःहून सेव्ह न करताही हा नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आलाच कसा? या प्रश्नानं अनेकांना भंडावून सोडलं होतं.  मात्र, या प्रकरणात गुगलची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द गुगलनं या प्रकरणी आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे. तसंच कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचंही स्पष्ट केले आहे. 

(मित्रों, मोबाईलची कॉन्टॅक्ट लिस्ट लगेच तपासा... आपोआप सेव्ह झालाय 'हा' क्रमांक)

गुगलचा माफीनामालाखो स्मार्टफोनधारकांना आमच्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे. झालेल्या चुकीबाबत आम्ही माफी मागतो. UIDAI आणि अन्य 112 हेल्पलाईन क्रमांक अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा क्रमांक एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह झाला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हाच क्रमांक पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. मात्र, तुमचा मोबाईल हॅक झालेला नाही. कोणताही सायबर हल्ला झालेला नाही.  UIDAIचा आपोआप सेव्ह झालेला क्रमांक तुम्ही डिलीट करू शकता.  नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा क्रमांक आपोआप सेव्ह होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत.  

नेमकं काय आहे प्रकरण?

लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन नंबर आपोआप सेव्ह झाला.  युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (यूआयएडीआय) यावर खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीला हेल्पलाइन नंबर युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फीड करण्यास सांगितले नाही. त्यामुळे हा हेल्पलाइन नंबर कसा काय आला, याची सोशल मीडियावर चर्चा आहे. फोनबुकमध्ये जो नंबर सेव्ह झाला, तो १८००-३००-१९४७ असा आहे. हा हेल्पलाइन नंबर जुना असल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले. नवा टोल फ्री-नंबर १९४७ हा आहे.आधारचा हेल्पालाईन क्रमांक 1947 हा असून अद्यापही हा क्रमांक सेवेत आहे.  

फ्रेंच सुरक्षा तज्ज्ञ एलियट एल्डरसन यांनी ट्विट करून सवाल केला की, वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांच्या काही युजर्सच्या फोनमध्ये त्यांना माहीत नसताना आधार नंबर सेव्ह कसा काय झाला?

आधार चॅलेंज

काही दिवसांपूर्वीच ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधारच्या गोपनीयतेचा संदर्भ देत आपली माहिती हॅक करुन दाखवावी, असं आव्हान दिलं होतं. शर्मा यांनी ट्विटरवरुन आव्हान त्यांचा आधार क्रमांक शेयर करत त्याला लिंक केलेली माहिती जाहीर करण्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर एका हॅकरनं शर्मा यांचा मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, जन्म तारीख, पॅन क्रमांक अशी महत्त्वाची माहिती समोर आणली होती.  

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डgoogleगुगल