गुगल म्हणतं, फेकू म्हणजे मोदी!
By Admin | Updated: December 29, 2016 22:27 IST2016-12-29T22:27:25+5:302016-12-29T22:27:25+5:30
फर्डे वक्ते आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून नेहमीच सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलंदाजीची त्यांचे विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात.

गुगल म्हणतं, फेकू म्हणजे मोदी!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - फर्डे वक्ते आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून नेहमीच सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलंदाजीची त्यांचे विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात. त्यातून मोदींच्या समर्थकांना भक्त आणि आणि भाषणबाज मोदींची फेकू असा उल्लेख विरोधकांकडून केला जातो. आता तर गुगलवरही फेकू या शब्दाचा अर्थ फेकू असा दाखवण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इंटरनेटवरील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर feku meaning असा शब्द सर्च केल्यावर गुगल फेकू म्हणजे मोदी. फेकूचा अर्थ थापाड्या असेही गुगलने यात म्हटले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींसाठी फेकू या नावाचा वापर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला होता.