शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

गुगल मॅपने दिला चकवा; गोव्याला निघालेलं बिहारचं कुटुंब थेट पोहोचलं कर्नाटकच्या जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:28 IST

Google Map Wrong Route : अन्न-पाणी नाही, मोबाईलला सिग्नल नाही; घनदाट जंगलात रात्रभर राहावे लागले

Google Map Wrong Route : गेल्या काही काळापासून Google Map मुळे रस्ता चुकल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका कुटुंबाने गुगल मॅपच्या मदतीने उज्जैनहून गोव्याचा प्रवास सुरू केला. पण, गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे, हे कुटुंब थेट कर्नाटकच्या घनदाट जंगलात अडकले. दोन पुरुष आणि दोन महिलांना रात्रभर या जंगलात राहावे लागले. 

अन्न-पाणी नाही, नेटवर्क नाही; घनदाट जंगलात काढली रात्र उज्जैनवरुन गोव्याचा प्रवास सुरू करणाऱ्या कुटुंबाला तांत्रिक बिघाडामुळे गुगल मॅपने शिरोली जंगलाच्या आत निर्जन आणि चुकीच्या वाटेवर नेले. वाटेत ना कोणती वस्ती होती, ना मोबाईल नेटवर्क होते. जंगलात खूप आत गेल्यावर त्यांना रस्ता चुकल्याचे समजले. रस्ता माहित नसल्यामुळे कुटुंब ना पुढे जाऊ शकत होते, ना मागे परत फिरू शकत होते. परिस्थिती इतकी बिकट झाली की, त्यांना रात्रभर त्या घनदाट जंगलात बसून राहावे लागले. 

पोलिसांनी कुटुंबाची जंगलातून सुखरूप सुटका केलीघाबरलेल्या आणि असहाय अवस्थेत त्यांनी गुरुवारी सकाळी चार किलोमीटर पायी चालत नेटवर्क मिळवले आणि आपत्कालीन सेवेच्या 112 क्रमांकावर फोन केला. कुटुंबीयांचा फोन आल्यानंतर खानापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना मदत केली. सहाय्यक उपनिरीक्षक के.आय. बडिगर आणि अधिकारी जयराम हणमनावार यांनी या कुटुंबाचा शोध घेतला आणि घनदाट जंगलातून 31 किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर त्यांना जंगलातून बाहेर काढले, अन्न-पाणी दिले आणि गोव्याचा योग्य मार्ग दाखवला.

यापूर्वीही अशा धोकादायक घटना घडल्या आहेतगुगल मॅपच्या चुकीने लोकांना अडचणीत टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्यात Google Maps ने उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका अपूर्ण पुलाची दिशा दाखवली, ज्यामुळे पुलावरुन कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेशिवाय देशभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. तंत्रज्ञानावरील अंधश्रद्धा धोकादायक ठरू शकते, हे या घटनांवरून दिसून येते. 

टॅग्स :BiharबिहारgoaगोवाKarnatakकर्नाटकgoogleगुगल