Google Map ने केली फजिती; कार गेली थेट तलावात, थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:13 PM2022-05-20T14:13:56+5:302022-05-20T14:14:18+5:30

Google: तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, पण कधी-कधी यामुळे मोठे नुकसानही सहन करावे लागते.

Google Map put family in trouble, missguide driver and car goes into lake, incident in Kerala | Google Map ने केली फजिती; कार गेली थेट तलावात, थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

Google Map ने केली फजिती; कार गेली थेट तलावात, थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

googlenewsNext

Google Map: आजकाल गूगल मॅप (Google Map) अतिशय उपयोगी अॅप मानलं जातं. कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायचं असेल, तर गूगल मॅपच्या मदतीने योग्य मार्ग सापडतो. वाहनातून असो किंवा पायी चालत, गूगल मॅप योग्य रस्ता दाखवायचे काम करतो. पण, अनेकदा या गूगल मॅपने भलताच रस्ता दाखवल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची घटना केरळच्या कुडुथुरुथीमध्ये घडली आहे.

नेमकं काय झालं?
गूगल मॅपमुळे एका कुटुंबाचा जीव धोक्यात गेला. केरळच्या कडुथुरुथीमध्ये चारचाकी वाहनातून जाणाऱ्या एका कुटुंबाला या गूगल मॅपने रस्त्याऐवजी थेट तलावात नेले. सुदैवाने आसपासच्या लोकांनी त्या कुटुबाला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकातील एक कुटुंब मुन्नारवरुन अलाप्पुझाच्या दिशेने जात होते. 

वळणानंतर दिला नाही अलर्ट
बुधवारी हे कुटुंब एका एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. मुन्नारवरुन निघताना गूगल मॅपवर नॅव्हिगेशन टाकले होते. यानंतर कार चालवणारा व्यक्ती गूगलने सांगितलेल्या मार्गाला फॉलो करू लागला. बुधवार दुपारी कडुथुरुथीच्या कुरुप्पंथरा कदवुजवळ अचानक कार एका तलावात गेली. याबाबत त्या कुटुंबाने सांगितले की, तलावाच्या आधी एक वळण होते, पण गूगलने आम्हाला सरळ जायला सांगितले. त्यानुसार, आम्ही सरळ गेलो, पण गाडी थेट पाण्यात गेली.

थोडक्यात वाचला जीव
कार तलावात जाताच कुटंबाने आरडा-ओरड सुरू केला. आवाज ऐकून आसपासचे लोक जमा झाले आणि त्या कुटुंबाला बाहेर काढले. यानंतर एक मोठी ट्रक मागवण्यात आली, त्या ट्रकला बांधून कारला पाण्यातून बाहेर काढले. पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे किती धोकादायक ठरू शकते, हे यावरुन कळेल.
 

Web Title: Google Map put family in trouble, missguide driver and car goes into lake, incident in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.