शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:22 IST

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेला मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे.  

नवी दिल्ली - शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेला मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे.   गतवर्षीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच आपल्या नियमित वेळापत्रकापेक्षा तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत केरळच्या सीमेपर्यंत धडक मारली होती. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला असून,  मंगळवारी मान्सून केरळमध्ये प्रवेश केला आहे.  दरम्यान, मान्सूनची  घोडदौड अशीच सुरू राहिली तर पुढील आठवडाभरात मान्सून कोकणासह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून दि. २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. मान्सून दरवर्षी सर्वसाधारणपणे दि. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तर अंदमानमध्ये दाखल होण्याची तारीख २० मे आहे. परंतु, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते़. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याने वेगाने वाटचाल केली. भारतीय हवामान विभागाकडून मागील काही वर्षांत जाहीर केलेला मान्सूनचा अंदाज खरा ठरला आहे. केवळ २०१५ मध्ये हा अंदाज चुकला होता. यावेळी विभागाने दि. ३० मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते. पण त्यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिराने दि. ५ जून रोजी झाले होते.  मागील वर्षी दि. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. तसेच हवामान विभागानेही ३० मे हा अंदाज व्यक्त केला होता. तर २०१३, २०१४ व २०१६ च्या अंदाजात केवळ १-२ दिवसांचा फरक होता.  

महाराष्ट्रात वेळेवर मान्सून दाखल होणार- डॉ. ए के श्रीवास्तवकेरळमध्ये मान्सूनने वेळे अगोदर आगमन केले असून सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कर्नाटकात येत्या 2 दिवसात असून दाखल होईल. महाराष्ट्रात वेळेवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसKeralaकेरळnewsबातम्या