शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:51 IST

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे.

नवी दिल्ली-

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे. या अंतर्गत आवश्यक सरकारी कागदपत्रे आधारद्वारे ऑटो अपडेट होतील. मात्र, ही प्रक्रिया सुरू होण्यास थोडा वेळ लागू शकतो. सरकारला एक अशी सिस्टम तयार करायची आहे जी युझरला आवश्यक कागदपत्रांवर घराचा पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही विभागाला किंवा मंत्रालयाला भेट देण्याची गरज भासणार नाही. नागरिकांनी त्यांच्या आधार कार्डमध्ये तपशील अपडेट केल्यावर हे काम आपोआप होईल.

आधारद्वारे ऑटो-अपडेट कसे काम करते?अहवालात असे म्हटले आहे की ही प्रणाली प्रामुख्याने अशा यूझर्सना मदत करेल ज्यांनी डिजीलॉकरवर कागदपत्रे स्टोअर केली आहेत. डिजीलॉकर यूझर्सना लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे डिजिटली सेव्ह करण्याची परवानगी देतो.

आधार कार्डमध्ये केलेले बदल डिजीलॉकरमध्ये असलेल्या इतर कागदपत्रांवर देखील केले जातील. हे सर्व यूझरवर अवलंबून असेल की त्याला या फिचरची निवड करायची आहे की नाही.

सध्या असे म्हणता येईल की MeitY परिवहन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज यांसारख्या मर्यादित मंत्रालयांसोबत काम करत आहे. या प्रक्रियेत नंतर इतर विभागांचाही समावेश होऊ शकतो जेणेकरून यूझर्स पासपोर्ट इ. ऑटो अपडेट करू शकतील. यासाठी सरकार सॉफ्टवेअर API (Application Programming Interface) विकसित करेल.

ऑटो-अपडेट सिस्टमचे फायदे:अहवालानुसार, आधारद्वारे डिजिलॉकर डॉक्युमेंट्सना अपडेट करण्यासाठी एक ऑटो-अपडेट प्रणाली तयार केली जाईल ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. यासोबतच बनावट कागदपत्रांची शक्यताही कमी होईल. हे अशा लोकांसाठी देखील खरे असेल जे त्यांच्या नोकरीमुळे वारंवार स्थान बदलत राहतात.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड