एसएनडीएलमध्ये गोंधळ -२
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:15+5:302015-01-23T01:05:15+5:30
बॉक्स..

एसएनडीएलमध्ये गोंधळ -२
ब क्स.. ग्राहकांच्या सेवेवर कुठलाही परिणाम नाही कंत्राटदारांच्या संपामुळे एसएनडीएल कंपनीच्या कामावर कुठलाही परिणाम झालेला नाही. काही कार्यालये थोड्या वेळासाठी बंद होती. मात्र ग्राहकांच्या सेवेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही आणि यापुढे सुद्धा होऊ देणार नाही. ग्राहकांची सेवा प्रभावित होऊ नये, यासाठी कंपनीने महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. कंपनी नियमानुसार थकीत रक्कम देण्यास तयार आहे. सोनल खुराना : बिजनेस हेड (एसएनडीएल)बॉक्स.. काम करण्यास नकार व्हेंडर असोसिएशनशी संबंधित २५ कंत्राटदारांनी एसएनडीएलचे काम सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. जेव्हपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही. तोपर्यंत कामाला हात लावणार नाही, असे कंत्राटदारांनी स्पष्ट केले आहे. कंपनीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत संपाबाबत पुढील दिशा ठरविली जाईल. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.