शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

रेल्वे लुटणारी टोळी गजाआड रेल्वे पोलिसांची कारवाई: तिघांना अटक

By admin | Published: May 08, 2014 4:00 PM

अहमदनगर: रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या पंकज दिलीप निमजे रा़दौंड याच्यासह तिघांना नगर रेल्वे स्थानकावर सापळा लावून पोलिसांनी पकडले़या टोळीकडून आणखी तिघा लुटारूंची नावे तपासात निष्पन्न झाली असून,लखनौ एक्सप्रेस, राजकोट एक्सपे्रसमध्ये लुटीचा प्रकार या टोळीकडून करण्यात आल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे़

अहमदनगर: रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या पंकज दिलीप निमजे रा़दौंड याच्यासह तिघांना नगर रेल्वे स्थानकावर सापळा लावून पोलिसांनी पकडले़या टोळीकडून आणखी तिघा लुटारूंची नावे तपासात निष्पन्न झाली असून,लखनौ एक्सप्रेस, राजकोट एक्सपे्रसमध्ये लुटीचा प्रकार या टोळीकडून करण्यात आल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे़पंकज दिलीप निमजे वय २२,(रा़दौंड),संतोष दादाराव वेट्टी,वय ३५,(रा़दौंड),कुमार रमेश सरोटे,वय ३५,(रा़दौंड) अशी पोलिसांनी पकडलेल्यांची नावे आहेत़उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी असते़ गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारी टोळी अनेक दिवसांपासून सक्रिय होती़ उन्हाळ्यात रेल्वे लुटीला आळा घालण्यासाठी नगर रेल्वे पोलिसांनी टोळी पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती़ या पथकाने वेषांतर करून लुटणार्‍यांची शोध मोहीम हाती घेतली होती़ पथकाने दौंडे रेल्वे स्थानकापासून गोवा एक्सप्रेस, कोपरगाव दरम्यान जनरल बोगीतून प्रवास केला असता पोलिसांना अकोळनेर जवळ रेल्वेत चोर शिरल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाली़ त्यानुसार नगर रेल्वेस्थानकात पोलिसांनी चोर पळून जाऊ नये, यासाठी आधीच सापळा लावला होता़ नगर रेल्वेस्थानक येथून शिर्डी- मुंबई रेल्वेत बसून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला़मात्र पोलिसांनी आरोपींचा म्होरक्या पंकज याला पकडले़त्यानंतर त्याच्याकडून आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली असून,इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़राजकोट एक्सप्रेस मध्यंतरी लुटण्यात आली होती़ सामान्य प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीने काही दिवसांपूर्वी नगर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे लुटली होती़ तेव्हापासून पोलीस या टोळीच्या शोधात होते़अखेर पोलिसांना ही टोळी पकडण्यात यश आले़ टोळीतील पंकज हा रेल्वे कर्मचार्‍याचा मुलगा आहे़ त्याला रेल्वेची बारीक सारीक माहिती असल्याने रेल्वे कुठे क्रॉसिंग होतात, याची सर्व माहिती पंकजला होती़ त्यामुळे ते सहजपणे रेल्वे लुटण्याचे काम करत होते़ मात्र पोलिसांनी अखेर सापळा लावून ही टोळी जेरबंद केली़ पोलिसी खाक्या दाखवताच टोळीने आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली असून,आरोपींना मनमाड येथील लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ नगर रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस़एस़ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली़पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़डी दिवटे, बी़ बी़ सलगर,कॉ़कोंगे, देशमुख, टिंगरे, कांबळे यांचा समावेश होता़