शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

Government Job: 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 10:13 IST

DSSC Group C Recruitment 2021, Sarkari Nokari: ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 

DSSC Group C Recruitment 2021: डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज (Defence Services Staff College) ने विविध जागांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी 10 वी आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यानुसार स्टेनोग्राफर, LDC, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कारपेंटर आणि MTS आदी पदांवर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (DSSC Recruitment 2021: Apply for 83 Multi-Tasking Staff, clerk and other posts.)

ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 

Defence Services Staff College (DSSC) Recruitment 2021: पदांचे विवरण...स्टेनोग्राफर- 4 पदलोअर डिव्हिजन क्लार्क- 10 पदसिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- 7 पदमल्टी टास्किंग स्टाफ- 60 पदअन्य - 2 पद

शैक्षणिक योग्यता आणि परिक्षेचे स्वरुप...स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी किंवा समकक्ष परीक्षा पास होणे गरजेचे आहे. स्कील टेस्ट नॉर्मनुसार 10 मिनिटांत 80 शब्द टायपिंग पाहिले जाणार आहे. याशिवाय 50 मिनिटांत इंग्रजी, 65 मिनिटांत हिंदी असे कॉम्प्युटरवर ट्रान्सलेशन करावे लागणार आहे. 

लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी उत्तीर्ण गरजेचे आहे. तसेच स्कील टेस्टमध्ये इंग्रजी 35 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे. 

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी 12 वी उत्तीर्ण, आणि अवजड वाहनांचे लायसन असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमध्ये दोन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभवही गरजेचा आहे. 

मल्टी टास्किंग स्टाफ- यासाठी दहावी पास होणे गरजेचे आहे. 

पगार- स्टेनोग्राफर (Stenographer) - 25500 ते 81100 रुपये लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk)- 19900 रुपये ते 63200 रुपयेसिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) - 19900 रुपये ते 63200 रुपयेसुखानी (Sukhani)- 19900 रुपये ते 63200 रुपयेकारपेंटर (Carpenter) - 19900 रुपये ते 63200 रुपयेमल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)- 18000 रुपये ते 56900 रुपये

निवड कशी केली जाणार...DSSC ग्रुप सी अंतर्गत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल/फिजिकल टेस्ट आधारे केली जाणार आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

अधिकृत नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीGovernmentसरकारjobनोकरी