३ कोटींचं सोनं अंगावर घालणारे 'गोल्डन बाबा'

By Admin | Updated: January 18, 2016 11:12 IST2016-01-18T11:08:01+5:302016-01-18T11:12:09+5:30

हरिद्वारमधईल अर्ध कुंभ मेळ्यात सध्या 'गोल्डन बाबा' सर्वाचं लक्ष वेधून घेत असून ते अंगावर तब्बल ३ कोटींचे सोनं घालतात.

'Golden Baba' wearing 3 crores gold | ३ कोटींचं सोनं अंगावर घालणारे 'गोल्डन बाबा'

३ कोटींचं सोनं अंगावर घालणारे 'गोल्डन बाबा'

ऑनलाइन लोकमत

हरिद्वार, दि. १८ - हरिद्वारमध्ये अर्ध कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून नागा बाबा आणि जुना आखाडाच्या साधुंनी वातावरण प्रफुल्लीत झाले आहे. मात्र या मेळ्यात येणा-या प्रत्येक भाविकाला उत्सुकता आहे ती ' गोल्डन बाबां'ना पाहण्याची... ३ कोटींचं सोन अंगावर घालणा-या या गोल्डन बाबांना पाहण्यासाठी घाटावार भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. 
सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा भक्तगणांसह शुक्रवारी गंगा नदीत स्नान करण्यासाठी उतरले आणि त्यांना पाहून अनेकांचे डोळेच दिपले. या बाबांच्या अंगावर तब्बल १५. ५ किलोचे सोन्याचे दागिने असून त्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. त्यांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याचं लॉकेट असून त्यांनी तब्बल २७ लाखांचे एक हि-याचे घड्याळही घातले आहे. ' जसं सोनं अतिशय मौल्यवान असतं, तसेच आमचे बाबाही आमच्यासाठी अमूल्य आहेत', असे सांगत बाबांचे भक्तगण त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचे एकप्रकारे समर्थन करतात.
मूळचे दिल्ली येथील असलेले सुधीर कुमार मक्कड (वय ५३) यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. मात्र त्यांनी संन्यास घेतला आणि साधू बनले. ' मी आयुष्यात अनेक चुका केल्या, व्यावसायिक म्हणूनही मी चुकलो. मात्र तीच पापं धुण्यासाठी मी हे पाऊल ( संन्यास घेण्याचे) उचलले आहे. आता मी दानधर्म करतो, विशेषत: गरीब लोकांना त्यांच्या मुलीचे लग्न करण्यासाठीही मदत करतो,' असे गोल्डन बाबांनी सांगितले.

Web Title: 'Golden Baba' wearing 3 crores gold