हैदराबाद विमानतळावर महिला प्रवाशांकडून 71 लाखांचे सोने जप्त
By Admin | Updated: April 20, 2017 20:32 IST2017-04-20T20:22:51+5:302017-04-20T20:32:45+5:30
हैदराबाद विमानतळावर दोन महिलांकडून 71 लाख किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

हैदराबाद विमानतळावर महिला प्रवाशांकडून 71 लाखांचे सोने जप्त
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 20 - हैदराबाद विमानतळावर दोन महिलांकडून 71 लाख किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
सीमा शुल्क अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिला प्रवाशांकडून 2.36 किलोग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत जवळपास 71 लाख रुपये इतकी आहे. साऊदी एअरलाइन्समधून प्रवास करणा-या एका महिलेकडून 2,000 ग्रॅम सोने आणि दुस-या महिलेकडून 360 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. दोन्ही महिलांनी कपड्यांमध्ये सोने लपवून ठेवले होते. सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधावरावर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, त्या महिलांना सीमा शुल्क अधिका-यांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.