शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:31 IST

केवळ एक रुपयाच्या थकबाकीसाठी ग्राहकाचे तारण ठेवलेले लाखो रुपयांचे सोने बँकेने जप्त केले.

चेन्नई - कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तगादा लावल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मोठमोठ्या उद्योगपतींच्या कोट्यवधीच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँका पै पै ची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वसामान्यांवर जप्तीची कारवाई करतात. असाच एक धक्कादायक प्रकार तामिळनाडूमधील एका शहरात समोर आला आहे. येथे केवळ एक रुपयाच्या थकबाकीसाठी ग्राहकाचे तारण ठेवलेले लाखो रुपयांचे सोने बँकेने जप्त केले. या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला असून, प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे.  कांचीपुरम येथील एका सहकारी बँकेने एका कर्जदाराला एक रुपयाचा थकबाकीदार घोषित केले. तसेच त्याने गहाण ठेवलेले सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे १६९ ग्रॅंम सोने जप्त केले. सी. कुमार असे या थकबाकीदाराचे नाव आहे. सी. कुमार हे थकलेला रुपया परत करण्यास तयार नव्हते असेही नाही. मात्र बँकेच्या आडमुठ्या वर्तनामुळे आता त्यांनी कोर्टाचा दकवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल आहे.  कांचीपुरम को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सी. कुमार यांनी ६ एप्रिल २०१० रोजी ३१ ग्रॅम सोने गहाण ठेवून १ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २८ मार्च २०११ रोजी त्यांनी संपूर्ण कर्ज व्याजासह बँकेला परत केले. पण या कर्जापैकी एक रुपया जमा करण्याचे राहून गेल्याचे बँकेच्या रेकॉर्डमध्ये नमुद झाले. त्यानंतर सी. कुमार यांनी ९ फेब्रुवारी २०११ रोजी ८५ ग्रॅम सोने गहाण ठेवून १.०५ लाख रुपये आणि २८ फेब्रुवारी २०११ रोजी ५२ ग्रॅम सोने गहाण ठेवून ६० हजार रुपये कर्जाऊ घेतले. काही काळाने सी. कुमार यांनी या दोन्ही कर्जांची परतफेड केली. मात्र एक रुपयाच्या शिलकीसह कर्ज खाते चालू राहिले.  दरम्यान, सी. कुमार यांनी थकीत एक रुपया परत घेऊन दागिने परत करण्याची बँकेला वारंवार विनंती केल्याचे कुमार यांचे वकील एम. साथयान यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनीसुद्धा बँकेवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र बँकेने अद्याप दागिने परत केलेले नाहीत. त्यामुळे कुमार यांना आपल्या दागिन्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत असून, त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.  गेल्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली असून, न्यायमूर्ती टी. राजा यांनी सरकारी वकिलाला या प्रकरणात माहिती देण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रGoldसोनंTamilnaduतामिळनाडू