सोने खरेदीच्या पॅन सक्तीला विरोध !
By Admin | Updated: March 17, 2015 23:57 IST2015-03-17T23:57:15+5:302015-03-17T23:57:15+5:30
सोने खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचे असेल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात केल्यानंतर, याचा जोरदार विरोध सराफ संघटनांनी केला आहे. ‘

सोने खरेदीच्या पॅन सक्तीला विरोध !
मुंबई : एक लाख रुपयांवरील सोने खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचे असेल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात केल्यानंतर, याचा जोरदार विरोध सराफ संघटनांनी केला आहे. ‘द आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ या प्रमुख संघटनेने हा निर्णय रद्द न केल्यास देशव्यापी संपाचा इशाराही दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मुळामध्ये सोन्याच्या खरेदीचे देशातील प्रमाण बघितले, तर ७० टक्के व्यवहार हे ग्रामीण भागातून होतात, तर ३० टक्के व्यवहार हे शहरी भागातून होतात. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश लोकांतर्फे कर प्रणालीतील विविध सुटीमुळे कर भरणा होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पॅन कार्ड नाही. तसेच, गेल्या काही वर्षात सोन्याच्या किमतीचा ट्रेंड बघितला तर तो तेजीचा आहे. सोन्याच्या किमती सातत्याने प्रति तोळा २५ हजार रुपये ते ३० हजार रुपये तोळा या दरम्यान आहेत. त्यामुळे सणासुदीनिमित्त अथवा एखाद्या मंगल कार्यासाठी जरी किमान सोने खरेदी झाली तरी त्याची किंमत एक लाख रुपयांच्या वर जाते. त्यात जर सरकारने पॅन कार्ड जर सक्तीचे केले तर त्याचा मोठा फटका या उद्योगाला बसेल. (प्रतिनिधी)
४उपलब्ध आकडेवारीनुसार देशात पॅनकार्डधारकांची संख्या ही १२ कोटींच्या आसपास आहे. त्यापैकी एक कोटी
४० लाख पॅन कार्ड गेल्यावर्षी जारी करण्यात आले.
४एकूण लोकसंख्येच्या तुलनेत पॅन कार्ड धारकांची संख्या ही जेमतेम साडेबारा टक्के इतकी आहे. त्यामुळे अशा निर्णयाचे तीव्र पडसाद या उद्योगावर उमटू शकतात.
४भारतीय लोकांची सोन्याची हौस, व्यवहारांचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता पॅन कार्ड सक्तीची मर्यादा एक लाख रुपयांवरून दहा लाख रुपये इतकी वाढवावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. तसेच, सोन्यावरील आयात शुल्कातही कपात करण्याची मागणी केली आहे.