सोन्याचा भाव अल्पसा वधारला
By Admin | Updated: July 29, 2014 23:25 IST2014-07-29T23:25:08+5:302014-07-29T23:25:08+5:30
साठेबाजांनी सणासुदीची खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांनी वधारून 28,37क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

सोन्याचा भाव अल्पसा वधारला
नवी दिल्ली : साठेबाजांनी सणासुदीची खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 2क् रुपयांनी वधारून 28,37क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सलग दुस:या दिवशी सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली. तिकडे चांदीचा भाव 44,8क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
स्टॉकिस्ट आणि व्यापा:यांनी सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्याने सोन्याचा भावात ही वाढ नोंदली. मात्र, जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे ही वाढ मर्यादित राहिली. जागतिक सराफा बाजारात घसरणीचा कल होता. सिंगापूर येथे सोन्याचा भाव क्.4 टक्क्यांनी कमी होऊन 1,3क्1.49 डॉलर प्रतिऔंस झाला.दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 2क् रुपयांनी वाढून अनुक्रमे 28,37क् रुपये व 28,17क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. यामध्ये सोमवारी 25क् रुपयांनी वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 44,8क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)