सोन्याचा भाव दोन महिन्यांच्या उच्चंकावर
By Admin | Updated: August 9, 2014 01:36 IST2014-08-09T01:36:19+5:302014-08-09T01:36:19+5:30
जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात तेजी नोंदली गेली.

सोन्याचा भाव दोन महिन्यांच्या उच्चंकावर
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात तेजी नोंदली गेली. शुक्रवारी सोन्याचा भाव 3क्क् रुपयांच्या तेजीसह 29,क्क्क् रुपयांची पातळी पार करीत दोन महिन्यांचा उच्चंक 29,1क्क् रुपये प्रति दहा ग्रॅमर्पयत जाऊन पोहोचला. तिकडे चांदीतही तेजीचाच कल कायम राहिला. औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांद्वारे खरेदी वाढल्याने चांदीचा भाव 2क्क् रुपयांच्या तेजीसह 44,7क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
सराफा व्यापा:यांच्या मते, सणासुदीची मागणी वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावांना उठाव मिळाला. सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्ट आणि आभूषण निर्मात्यांनी सातत्याने मागणी केल्याने सोन्याच्या भावात तेजी नोंदली.
जागतिक बाजारातही सोन्याचा भाव तीन आठवडय़ांच्या उच्चंकी पातळीवर पोहोचला. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव क्.7 टक्क्यांच्या तेजीसह 1322.14 डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या 18 जुलैनंतरची ही उच्चंकी पातळी आहे. चांदीचा भाव क्.6 टक्क्यांनी वाढून 2क्.क्8 डॉलर प्रतिऔंसार्पयत गेला. दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 3क्क् रुपयांनी वधारून अनुक्रमे 29,1क्क् रुपये आणि 28,9क्क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही 1,क्क् रुपयांनी उंचावून 25,क्क्क् रुपयांवर बंद झाला.
तयार चांदीचा भाव 2क्क् रुपयांनी वाढून 44,7क्क् आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 14क् रुपयांनी उंचावून 44,18क् रुपये प्रतिकिलोवर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)