जागतिक घसरणीने सोन्याचा भाव कोसळला
By Admin | Updated: July 23, 2014 01:28 IST2014-07-23T01:28:59+5:302014-07-23T01:28:59+5:30
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टनी खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 275 रुपयांनी खाली येऊन 28,2क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

जागतिक घसरणीने सोन्याचा भाव कोसळला
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टनी खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 275 रुपयांनी खाली येऊन 28,2क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून चांगली मागणी न झाल्याने 2क्क् रुपयांनी स्वस्त होऊन प्रतिकिलो 45,2क्क् रुपये झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी बाजारात व्यापा:यांकडून कमी झालेली मागणी आणि शेअर बाजारातील तेजी यामुळे या मौल्यवान धातूंतील गुंतवणुकीला पर्याय निर्माण झाला. जागतिक बाजारातही डॉलर आणि समभाग मजबूत झाल्याचा सराफा बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.5 टक्क्यांनी कमी होऊन 1,3क्5.4क् डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही क्.2 डॉलरनी घसरून 2क्.88 डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीच्या बाजारातही 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 275 रुपयांनी घटून अनुक्रमे 28,2क्क् आणि 28,क्क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ गॅ्रम गिनीचा भावही 1क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 24,8क्क् रुपयांवर आला. तयार चांदीचा भाव 2क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 45,2क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 175 रुपयांनी खाली येऊन 44,91क् रुपये प्रतिकिलोवर राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव एक हजार रुपयांनी खाली येऊन खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये आणि विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)