सोने वाढले ३00 रुपयांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:49 IST2017-08-18T00:44:05+5:302017-08-18T00:49:35+5:30
जागतिक बाजारातील तेजीचा कल आणि स्थानिक बाजारातील वाढलेली मागणी यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोने ३00 रुपयांनी वाढून ३0,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

सोने वाढले ३00 रुपयांनी
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीचा कल आणि स्थानिक बाजारातील वाढलेली मागणी यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोने ३00 रुपयांनी वाढून ३0,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी ९00 रुपयांनी वाढून ४0,२00 रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.४३ टक्क्याने वाढून १,२८८.३0 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदी 0.१२ टक्क्याने वाढून १७.१२ डॉलर प्रतिऔंस झाली.