सोने 225 रुपयांनी उतरले
By Admin | Updated: November 15, 2014 00:38 IST2014-11-15T00:38:55+5:302014-11-15T00:38:55+5:30
राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 225 रुपयांनी कोसळून 26,135 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

सोने 225 रुपयांनी उतरले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 225 रुपयांनी कोसळून 26,135 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक सराफ्यात व्यापारी व किरकोळ ग्राहक यांची मागणी कमी झाल्याने ही घट नोंदली गेली आहे. चांदीचा भावही 8क्क् रुपयांच्या आपटीसह 34,6क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
जाणकारांच्या मते, जागतिक बाजारातील घसरणीचा स्थानिक बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला. क्रूड तेलाच्या भावाने चार वर्षाचा तळ गाठला असून दुसरीकडे अमेरिकी डॉलर तेजीत आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणुकदारांना पर्यायी गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला प्राधान्य दिले.
देशी बाजाराचा कल ठरविणा:या सिंगापुरात सोन्याचा भाव 1.1 टक्क्याने घसरुन 1,149.87 डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव 2.4 टक्क्यांनी कमी होऊन 15.28 रुपये प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारात 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 225 रुपयांनी घसरुन अनुक्रमे 26,135 रुपये आणि 25,935 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 1क्क् रुपयांच्या घसरणीसह 23,6क्क् रुपयांवर आला. तयार चांदीचा भाव 8क्क् रुपयांनी कमी होऊन 34,6क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 766 रुपयांनी घसरुन 33,999 रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी खाली येऊन खरेदीकरता 57,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 58,क्क्क् रुपये प्रतिशेकडा झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)ं