भटक्या कुत्र्यांना मारल्यास मिळणार सोन्याचं नाणं
By Admin | Updated: October 30, 2016 16:00 IST2016-10-30T16:00:20+5:302016-10-30T16:00:20+5:30
भटक्या कुत्र्यांना मारल्यास चक्क सोन्याचं नाणं देण्याची घोषणा केरळमध्ये करण्यात आली आहे. एका प्रख्यात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ही घोषणा केली आहे.

भटक्या कुत्र्यांना मारल्यास मिळणार सोन्याचं नाणं
ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपुरम, दि. 30 - भटक्या कुत्र्यांना मारल्यास चक्क सोन्याचं नाणं देण्याची घोषणा केरळमध्ये करण्यात आली आहे. एका प्रख्यात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ही घोषणा केली आहे. नागरी संस्थेचे जे अधिकारी 10 डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त भटके कुत्रे मारतील त्यांना सोन्याची नाणी देण्यात येतील असं संघटनेनं म्हटलं आहे. केरळमध्ये गेल्या 4 महिन्यात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांत 4 जणांचा जीव गेला असून जवळपास 700 लोक जखमी झाले आहेत.
पला येथील सेंट थॉमस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ही घोषणा केली आहे. यापुर्वी विद्यार्थ्यांच्या या संघटनेने भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी नागरिकांना एअर गन दिल्यामुळे ही संघटना चर्चेत आली होती. संघटनेचे महासचिव जेम्स पमबायकल म्हणाले, ज्या पंचायतींमध्ये किंवा नागरी संस्थांमध्ये जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांना मारण्यात येईल त्यांना बक्षीस देण्याचा आमचा विचार आहे. भटक्या कुत्र्यांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही हे करत आहोत असं ते म्हणाले.