सोने-चांदी उसळले
By Admin | Updated: December 10, 2014 23:35 IST2014-12-10T23:35:26+5:302014-12-10T23:35:26+5:30
हंगामी मागणीत झालेली वाढ तसेच जागतिक बाजारातील तेजी यामुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी अभूतपूर्व तेजी आली.

सोने-चांदी उसळले
नवी दिल्ली : हंगामी मागणीत झालेली वाढ तसेच जागतिक बाजारातील तेजी यामुळे राजधानी दिल्लीतील सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी अभूतपूर्व तेजी आली. सोने 650 रुपयांनी वाढून 27,470 रुपये तोळा झाला. चांदीचा भाव 1,600 रुपयांनी वाढून 38,400 रुपये किलो झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, रुपयाच्या किमतीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीकडे मोर्चा वळविला आहे. रुपया स्वस्त झाल्याने सोन्याची आयात महागणार आहे. हेही एक कारण तेजीमागे आहे. लगAसराईसाठी दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी जोरात खरेदी केल्यामुळे स्थानिक बाजारांत मागणीचा जोर राहिला. त्याचाही परिणाम किमतींवर झाला.
राजधानी दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 650 रुपयांनी वाढून अनुक्रमे 27,470 रुपये तोळा आणि 27,270 रुपये तोळा झाला. काल सोन्याचा भाव 170 रुपयांनी वाढला होता. सोन्याच्या 8 ग्रॅमच्या गिन्नीचा भाव 100 रुपयांनी वाढून 23,800 रुपये झाला.
तयार चांदीच्या भावात 1,600 रुपये वाढ झाली. त्याबरोबर ही चांदी 38,400 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 1,815 रुपयांनी वाढून 38,615 रुपये किलो झाला. चांदीचे शिक्के 1 हजार रुपयांनी महागले. त्यांचा भाव खरेदीसाठी 63 हजार रुपये तर विक्रीसाठी 64 हजार रुपये प्रतिशेकडा असा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4भारतातील सोन्याच्या भावावर परिणाम करणा:या न्यूयॉर्कच्या बाजारात सोन्याचा भाव 28 डॉलरनी वाढून 1,238.32 प्रतिऔंस झाला आहे.
4हा तब्बल सहा आठवडय़ांचा उच्चंक आहे.
4 जागतिक पातळीवर शेअर बाजारांत नरमाईचे वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळले आहेत.
4 न्यूयॉर्कच्या बाजारात चांदीचा भावही 5.2 टक्के वाढून 17.12 डॉलर प्रतिऔंस झाला आहे.