शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

ॲडमिशनला जाताय? ही कागदपत्रे ठेवा सोबत; अभ्यासक्रमासाठी फाॅर्म भरताना घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 11:11 IST

कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळदेखील वाढली आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमात ॲडमिशनसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळदेखील वाढली आहे. विद्यार्थ्यांनी काेणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा फॉर्म भरताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. 

मेडिकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे-

  • नीट ऑनलाईन फाॅर्मची प्रिंट
  • नीट प्रवेश पत्र व नीट मार्कलिस्ट
  • मार्क मेमो १० वी, सनद १० वी, मार्क मेमो १२ वी
  • नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
  • रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांचा फॉर्म नं १६ 
  • १२ वीची टीसी 
  • मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस 
  • मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते पासबूक
  • मुलाचे तसेच आई व वडील दोघांचेही पॅनकार्ड

मागासवर्गीयांसाठी वरील सर्व कागदपत्रांसह खालील प्रमाणपत्रेही आवश्यक-

  • जात प्रमाणपत्र
  • जातवैधता प्रमाणपत्र
  • नाॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र 

या गाेष्टी आवर्जून लक्षात ठेवा-

  • अर्ज चुकू नये म्हणून सुुरुवातीला झेरॉक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 
  • अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. 
  • इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. 
  • बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो जवळ बाळगा.

इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना आवश्यक दस्तावेज-

  • जात प्रमाणपत्र
  • जातवैधता प्रमाणपत्र
  • नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र
  • डोमिसाइल प्रमाणपत्र
  • ईडब्ल्यूएस वर्ग प्रमाणपत्र
  • दिव्यांगता प्रमाणपत्र
  • आधार क्रमांक, बँक खाते पासबूक
  • सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र
  • अल्पसंख्यक वर्गाचे प्रमाणपत्र
टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय