पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे सारखेच - मनोहर पर्रीकर
By Admin | Updated: August 16, 2016 15:09 IST2016-08-16T15:03:23+5:302016-08-16T15:09:27+5:30
पाकिस्तानवर हल्लाबोल करताना पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच असल्याची टीका मनोहर पर्रीकर यांनी केली आहे

पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे सारखेच - मनोहर पर्रीकर
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दहशतवाद्याच्या मुद्यावर पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानची तुलना नकराशी केली आहे. पाकिस्तानवर हल्लाबोल करताना पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच असल्याची टीका मनोहर पर्रीकर यांनी केली आहे. हरियाणातील रेवाडीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सोमवारी सीमारेषेवरुन घुसखोरी करणा-या पाच दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केलाय. त्याचा उल्लेख करत मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानवर बोचरी टीका केली आहे. 'काल आमच्या जवानांनी पाच लोकांनी परत पाठवलं, पाकिस्तानात जाणं आणि नरकात जाणं सारखंच आहे', असं मनोहर पर्रीकर यांनी यावेळी केली. 'स्वत: शहीद होण्याऐवजी शत्रुचा खात्मा करा', असा सल्लाही यावेळी मनोहर पर्रीकर यांनी भारतीय जवानांना दिला.