गोडसे मंदिरप्रकरणी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 27, 2014 00:06 IST2014-12-27T00:06:31+5:302014-12-27T00:06:31+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला मंदिर समर्पित करण्याच्या घोषणेबद्दल व आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अखिल

गोडसे मंदिरप्रकरणी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
मेरठ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला मंदिर समर्पित करण्याच्या घोषणेबद्दल व आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्याविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आचार्य मदान यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ५०४ व ५०५ (१)अन्वये ब्रहामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितले.
बुधवारी महासभेच्या कार्यालयात मदान यांनी उभारण्यात येणाऱ्या मंदिरात ३० जानेवारी रोजी गोडसेचा पुतळा स्थापन करण्याची घोषणा केली होती असेही त्यांनी पुढे नमूद केले.
मदान यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती व गोडसे याचे देशातील एकमेव मंदिर मेरठमध्ये राहणार असल्याचे म्हटले होते अशी माहिती ओमप्रकाश यांनी पुढे दिली.
बुधवारी या संघटनेने मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुरुवारी चौकशीचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)