शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोध्रा कांड : साबरमती एक्सप्रेसला आग लावणाऱ्या 8 दोषींना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:15 IST

2002 च्या गोध्रा साबरमती एक्सप्रेस ट्रेनमध्ये 59 जणांना जिवंत जाळण्यात आले होते.

अहमदाबाद : गुजरातमधील गोध्रा येथे 2002 साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना न्यायालयाकडून हा मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार दोषींना जामीन देण्यास नकार दिला. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले.

सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने गोध्रा प्रकरणातील दोषींच्या जामीन प्रकरणावर निर्णय दिला. जामीन मिळालेले 8 दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. जामिनाच्या अटी पूर्ण केल्यानंतर उर्वरितांची जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. दोषींचे वकील संजय हेगडे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामिनावर सोडण्याचे आवाहन केले.

साबरमती एक्स्प्रेसमध्ये 59 जणांना जिवंत जाळण्यात आले2002 च्या गोध्रा साबरमती एक्सप्रेस ट्रेनमध्ये 59 जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहिम गड्डी यांच्यासह 27 दोषींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

बोगी बंद करून लोक जाळले : तुषार मेहतागुजरात सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, हे केवळ दगडफेकीचे प्रकरण नाही. गुन्हेगारांनी साबरमती एक्स्प्रेसची बोगी बंद करुन जाळ लावल, त्यात 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले होते. तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, काही लोक आपली भूमिका केवळ दगडफेकीची होती, असे म्हणत आहेत, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या बोगीला बाहेरून कुलूप लावता, ती पेटवता आणि नंतर दगडफेक करता, ती केवळ दगडफेक नसते.

फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर विचार नाही: SCगेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ज्या दोषींना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु उच्च न्यायालयाने त्यांचे जन्मठेपेत रूपांतर केले होते, त्यांच्या जामीनाचा विचार केला जाणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीच्या पत्नीला कॅन्सरमुळे अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवला होता.

टॅग्स :GujaratगुजरातSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी