गोदावरीत कचरा सफाई मोहीम
By Admin | Updated: June 19, 2015 14:08 IST2015-06-19T02:21:28+5:302015-06-19T14:08:21+5:30
कायगाव : जुने कायगाव येथील गोदावरी नदीत असणारा कचरा काढण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला असून नदीच्या घाटाजवळील दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साह्याने कचरा काढण्यात येत आहे.

गोदावरीत कचरा सफाई मोहीम
कायगाव : जुने कायगाव येथील गोदावरी नदीत असणारा कचरा काढण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला असून नदीच्या घाटाजवळील दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साह्याने कचरा काढण्यात येत आहे.
नदीपात्रातील कचर्याने पाण्याचे प्रदूषण होत असून नदीपात्राजवळ विविध धार्मिक विधी पार पडतात. विधीसाठी येणारेच नदीपात्र प्रदूषित करीत असून दूषित पाण्यामुळे परिसरात रोगराईची भीती निर्माण झाली आहे. अनेक वस्तू नदीपात्रात फेकल्या जात असल्याने नदीपात्र गटारगंगा झाली आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी काळवंडले असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे.
गुरुवारी ह.भ.प जनार्दन महाराज मेटे यांच्या पुढाकाराने गोदावरी बचाव अभियान राबविण्यात आले. यात घाटाशेजारील दोन्ही बाजूचा कचरा काढण्यात आला. कचरा ओला असल्याने तिची विल्हेवाट आज लावण्यात आली नसली तरी सुमारे पाच ट्रॉली कचरा एका जागी गोळा करून ती वाळल्यानंतर त्यास पेटवून दिले जाईल. भाविकांनी नदीत आणून टाकलेल्या विविध मूर्त्यांची विटंबना होत असल्याने त्यांना गोळा करून पुरून टाकण्यात आले.
गोदावरी बचाव अभियानाचे उद्घाटन सरपंच अनिल उचित यांच्या हस्ते करण्यात आले. अभियानात जनार्दन महाराज मेटे, आबासाहेब शिरसाठ, साहेबराव पाटील डोणगावकर, शाळेचे सहशिक्षक अय्यूब शेख, विलास जाधव, रंजक शिरसाठ, विजय फाजगे, अनिल बिरुटे, रमेश फाजगे आदींसह शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.