गोदातीरी आज पहिले कुंभस्नान !

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:14+5:302015-08-28T23:37:14+5:30

Goddary today is the first Kumbhnan! | गोदातीरी आज पहिले कुंभस्नान !

गोदातीरी आज पहिले कुंभस्नान !

>नाशिक-त्र्यंबकेश्वर नटले : पर्वणी अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू दाखल

नाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात शनिवारी गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरनगरी नववधूसारख्या नटल्या आहेत.
शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणार्‍या प्रशासनाची शनिवारी कसोटी लागणार आहे. नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नान होईल, त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल.
त्र्यंबकेश्वरी शनिवारी पहाटे ब्रšामुहूर्तावर ४.१५ वा. जुना आखाड्याचे साधू-महंत प्रथम शाहीस्नान करतील, तर नाशिकला सकाळी ७ वा. निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान करतील.
सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९ तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धमार्ेत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकीचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.
शाही पर्वणी निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंड आणि कुशावर्ताचा ताबा घेतला. साधू-महंतांचे स्नान होईपर्यंत भाविकांना दोन्ही तीर्थावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-------------------------
साध्वींची स्वतंत्र व्यवस्था नाही
महिला साध्वींच्या स्वतंत्र स्नानाची व्यवस्था पहिल्या पर्वणीत करण्यात आलेली नाही. प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ देण्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्याबाबत न्यायालयाने तोडगा काढण्याचे सुचविले आहे. सोमवारी त्याबाबत बैठक होणार आहे.
-------------------------
शाही स्नानास सुरुवात
- त्र्यंबकेश्वर : ब्रšामुहूर्तावर पहाटे ४.१५ वा.
- नाशिक : सकाळी ७ वा.
--------------------------------

Web Title: Goddary today is the first Kumbhnan!