शिक्षण क्षेत्रातही गोवा सरकारचे भगवीकरण!
By Admin | Updated: June 13, 2015 01:49 IST2015-06-13T01:49:08+5:302015-06-13T01:49:08+5:30
गोव्यातील भाजपा सरकारने शिक्षण क्षेत्रात भगवीकरण चालविल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे.

शिक्षण क्षेत्रातही गोवा सरकारचे भगवीकरण!
पणजी : गोव्यातील भाजपा सरकारने शिक्षण क्षेत्रात भगवीकरण चालविल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. विद्यालयांना परवानगी देणे आणि साधनसुविधा निधी मंजूर करण्यात सरकारकडून भेदभाव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात साधनसुविधांचे वितरण करताना भेदभाव करण्याचे प्रकार भाजपा राजवटीत सुरू
करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, निदान शैक्षणिक क्षेत्रात तरी असा
भेदभाव नको होता. साधनसुविधा वितरणातून तो स्पष्टपणे जाणवत आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी ५० हून अधिक योजना उत्कृष्टपणे राबविल्या.
केवळ शिक्षणच नव्हे, तर सर्व क्षेत्रात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. कूळ व मुंडकार कायद्यात दुरुस्ती करून सरकारने बहुजनांच्या पोटावर पाय दिल्याचे ते म्हणाले. या कायद्याविरुद्ध लढा पुकारलेल्या गोवा बहुजन महासंघाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)