श्रीरामशक्ती पिठातर्फे गोदावरी स्वच्छता मोहीम

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

भाविकांशी उद्धट वागणूक केल्याचा आरोप

Godavari Cleanliness Campaign by Shriram Shakti Pitha | श्रीरामशक्ती पिठातर्फे गोदावरी स्वच्छता मोहीम

श्रीरामशक्ती पिठातर्फे गोदावरी स्वच्छता मोहीम

विकांशी उद्धट वागणूक केल्याचा आरोप

पंचवटी : त्र्यंबकेश्वर येथिल श्रीरामशक्ती पिठाच्या वतीने सकाळी रामकुंड तसेच गंगाघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली खरी मात्र स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या सेवेकर्‍यांनी भाविकांशी उद्धट वागणूक केल्याचा आरोप गंगाघाटावर आलेल्या काही भाविकांनी तसेच नागरीकांनी केला आहे.
सकाळी धर्माचार्य बाल ब्रम्हचारी सोमेश्वर चैतन्य महाराज, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमितजी बग्गा यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी स्वच्छता मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. श्रीरामशक्तीपिठाचे शेकडो सेवकर्‍यांनी श्री रामकुंड, सिताकुंड तसेच लक्ष्मण कुंडातील गाळ व कपडे नदीपात्रातून काढण्याचे काम प्राधान्याने केले मात्र नदीपात्रातील घाण काढतांना ती थेट नदीपात्राबाहेर फेकली जात असल्याने ती भाविकांच्या अंगावर उडत होती. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी तसे करू नका असे सांगितले असता त्यांच्याशी देखिल काही सेवेकर्‍यांनी शाब्दीक चकमक केल्याचे वृत्त आहे. श्रीरामशक्ती पिठाच्या शेकडो सेवेकर्‍यांनी गंगाघाट परिसरात आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविल्याचे सांगण्यातआले. सेवेकर्‍यांनी गोदाकाठचा परिसर स्वच्छ करण्याचे काम प्राधान्याने केले मात्र हे काम करतांना नदीपात्रातील स्वच्छ करतांना सेवेकर्‍यांनी केलेल्या वागणुकीमुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांनाही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागल्याची चर्चा आहे. दरम्यान लक्ष्मण कुंडातून रामकुंडात जाणार्‍या पाण्यातून घाण जाऊ नये म्हणून बसविण्यात आलेल्या जाळया देखिल काढून घेतल्या त्यामुळे रामकुंडात नदीपात्रात घाण पाणी गेले. याशिवाय नदीपात्र स्वच्छ करतांना हे काम आमचे नाही असे म्हणूनही काही सेवेकर्‍यांनी भाविकांशी वाद घातल्याचे समजते. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
हे काम आमचे नाही
सकाळी नदीपात्र स्वच्छतेसाठी आलेल्या श्रीरामशक्तीपिठाच्या काही सेवेकर्‍यांनी भाविकांशी वाद घालून हे काम आमचे नाही असे सांगितले. जर नदीपात्र स्वच्छ करायचे नव्हते तर सेवेकर्‍यांनी केवळ स्टंटबाजी करण्यासाठी ही मोहीम राबविल्याची चर्चा होती.

Web Title: Godavari Cleanliness Campaign by Shriram Shakti Pitha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.