गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांना धारेवर धरले
By Admin | Updated: August 5, 2014 03:17 IST2014-08-05T03:17:16+5:302014-08-05T03:17:16+5:30
दक्षिण गोव्यातील आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, हॉस्पिसियो इस्पितळातील गैरसोयींसारख्या प्रश्नांवरून सोमवारी काँग्रेससह विरोधकांनी विधानसभेत आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना धारेवर धरले.

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांना धारेवर धरले
पणजी : दक्षिण गोव्यातील आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष, हॉस्पिसियो इस्पितळातील गैरसोयींसारख्या प्रश्नांवरून सोमवारी काँग्रेससह विरोधकांनी विधानसभेत आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना धारेवर धरले.
सांगे आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्यात अपयश, धारबांदोडातील रुग्णाचा ऑक्सिजनअभावी रुग्णवाहिकेत झालेला मृत्यू यासारख्या विषयांवरून विधानसभेत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भाजपा सरकारला अडचणीत आणले.
प्रश्नोत्तराच्या तासात अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावमधील हॉस्पिसियो इस्पितळातील असुविधा व अपु:या मनुष्यबळाकडे पार्सेकर यांचे लक्ष वेधले. नव्या जिल्हा इस्पितळाची इमारत पूर्ण होईर्पयत दीड वर्ष लागतील.
तोर्पयत पर्यायी व्यवस्था म्हणून हॉस्पिसियो इस्पितळातील सेवांमध्ये सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही त्यांच्या मागणीस पाठिंबा दिला. आरोग्यमंत्र्यांनी दोन वर्षात एकदाही 1क्8 ईएमआरआय सेवेचे ऑडिट केलेले नाही, अशी टीका काँग्रेस आमदार विश्वजित राणो यांनी केली.
ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होणो, हा फौजदारी गुन्हा असल्याचे ते म्हणाले. आरोग्य खात्याच्या संचालकाविरुद्ध या प्रकरणी एफआयआर नोंदवा, अशीही मागणी त्यांनी केली. (खास प्रतिनिधी)