गोव्यात आमदाराच्या गाडीने दुचाकीस्वारास उडविले

By Admin | Updated: May 16, 2015 00:33 IST2015-05-16T00:33:25+5:302015-05-16T00:33:25+5:30

वास्को : माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या इनोव्हा कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला अमेरिकन नागरिक गंभीर जखमी झाले.

In Goa, a two-wheeler flew by a maid's vehicle | गोव्यात आमदाराच्या गाडीने दुचाकीस्वारास उडविले

गोव्यात आमदाराच्या गाडीने दुचाकीस्वारास उडविले

स्को : माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या इनोव्हा कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलचालकाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला अमेरिकन नागरिक गंभीर जखमी झाले.
आमदार फळदेसाई शुक्रवारी सकाळी इनोव्हा कारने दाबोळी विमानतळावर जात होते. तेव्हा ७.१५च्या सुमारास झुवारीनगर येथील एमईएस कॉलेजजवळील नाक्यावर हा अपघात घडला. या धडकेत मोटारसायकल चालक सुनील रामजी राठोड (२२) आणि मागे बसलेला मेक्लेव्हेयिन मॅथ्यू (२५) हा अमेरिकन नागरिक गंभीर जखमी झाले. जखमींना गोमेकॉत उपचारासाठी नेत असताना सुनील राठोड याचा मृत्यू झाला. वास्कोचे उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा यांनी सायंकाळी या अपघाताबाबत पत्रकारांना माहिती दिली.
निष्काळजीपणा तसेच अतिवेगाने वाहन चालविल्याबद्दल मोटारचालक प्रिजेश गावकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली आणि उशिरा त्याची जामिनावर सुटका केली. (प्रतिनिधी)

Web Title: In Goa, a two-wheeler flew by a maid's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.