गोवा पर्यटनमंत्र्यांचे जगभर ‘पर्यटन’
By Admin | Updated: July 23, 2014 03:03 IST2014-07-23T03:03:50+5:302014-07-23T03:03:50+5:30
गोव्याचे पर्यटनमंत्री, पर्यटन खात्याचे सचिव, अधिकारी यांनी मार्च 2012पासून केलेल्या विदेश दौ:यांची माहिती जाहीर झाली आहे. त्यावर 6 कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाले.

गोवा पर्यटनमंत्र्यांचे जगभर ‘पर्यटन’
पणजी : गोव्याचे पर्यटनमंत्री, पर्यटन खात्याचे सचिव, अधिकारी यांनी मार्च 2012पासून केलेल्या विदेश दौ:यांची माहिती जाहीर झाली आहे. त्यावर 6 कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाले.
मार्च 2012मध्ये मेल्वीन वाझ, राजेश काळे या अधिका:यांसह पर्यटन खात्याच्या एका सल्लागाराने 6 दिवसांचा बर्लिनचा दौरा केला होता. दौ:यास केंद्र सरकारची मान्यता न मिळाल्याने संबंधितांनी खर्चही सादर केला नाही. एप्रिलमध्ये पुन्हा 5 दिवसांचा मॉस्कोचा दौरा झाला. एप्रिलचा शेवटचा आठवडा व मेच्या पहिल्या आठवडय़ार्पयत काही वरिष्ठ अधिका:यांनी काठमांडूचा दौरा केला. या दौ:यासही केंद्राची मान्यता न मिळाल्याने बिलांवर दावा करण्यात आला नाही. सप्टेंबरमध्ये 6 दिवसांच्या मॉस्को दौ:यात साडेचार लाख रुपये खर्च केले. ऑक्टोबरमध्ये 7 दिवस लिस्बन व पोतरुगालचा दौरा पार पडला. त्यात पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, जनसंपर्क अधिकारी सहभागी झाले.
ऑक्टोबर अखेरीस पाच दिवस सिंगापूरला काही अधिकारी अभ्यासदौ:यावर गेले होते. नोव्हेंबर 2क्12मध्ये 4 दिवस पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, ऊर्जामंत्री मिलिंद नाईक व वरिष्ठ अधिकारी जागतिक व्यापार मेळाव्यासाठी लंडनला गेले होते. नोव्हेंबरमध्येच परुळेकर व नाईक यांनी 4 दिवस हंगेरीची सफर केली. मार्च 2क्13मध्ये कोपेनहेगन, डेन्मार्क, नेदरलँडचा पुन्हा अधिका:यांनी 5 दिवस दौरा केला. याच महिन्यात परुळेकर व अधिका:यांनी परदेश दौरा केला.