गोवा मल्टी फॅकल्टीतर्फे शिक्षक

By Admin | Updated: September 5, 2015 00:36 IST2015-09-05T00:36:42+5:302015-09-05T00:36:42+5:30

गोवा मल्टी फॅकल्टीतर्फे शिक्षकांचा सत्कार

Goa Multi Faculty teacher | गोवा मल्टी फॅकल्टीतर्फे शिक्षक

गोवा मल्टी फॅकल्टीतर्फे शिक्षक

वा मल्टी फॅकल्टीतर्फे शिक्षकांचा सत्कार

कुळे: शिक्षक दिनाचे औचित्य साधून दयानंदनगर धारबांदोडा येथील गोवा मल्टी फॅकल्टी महाविदय़ालयातर्फे शनिवार दि. 5 रोजी गोव्यातील उच्च माध्यमिक विदय़ालयातील 29 शिक्षकांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याच बरोबर 9 शिक्षकेतर कर्मचार्‍याना सेवा भूषण पुरस्कार देण्यात येईल.
पिळये येथील स्व. सदाशिव वामन मराठे समाज सभागृहात दुपारी 3.30 वाजता हा गौरव सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेंद्र सावईकर, प्रमुख वक्ते म्हणून दिलीप बेतकीकर,महाविदय़ालयाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर व डॉ. मनोज कामत उपस्थित असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Goa Multi Faculty teacher