गोव्याच्या आमदाराला बलात्कार प्रकरणी जामीन
By Admin | Updated: May 18, 2016 11:28 IST2016-05-18T11:06:08+5:302016-05-18T11:28:21+5:30
गोव्यातील सांताक्रुझ मतदारसंघातील असंल्गन आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यास अखेर बुधवारी सशर्त जामीन मिळाला.

गोव्याच्या आमदाराला बलात्कार प्रकरणी जामीन
>ऑलाइन लोकमत
पणजी, दि. १८ - गोव्यातील सांताक्रुझ मतदारसंघातील असंल्गन आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यास
अखेर बुधवारी सशर्त जामीन मिळाला. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश याच्यावर दाखल केलेला आहे. मुलीची आई आणि मध्यस्थ महिला रोझी फेर्रास यांनाही जामीन मिळाला. बाल न्यायालयाने हा निर्णय देताना बाबूशला सात दिवस दररोज गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावण्यास बजावले आहे. तसेच एक लाख रूपयांची हमीही न्यायालयाने घेतलेली आह. आपल्या आईने आणि अन्य एका महिलेने आपल्याला पन्नास लाख रुपयांना विकल्याचा जबाब संबंधित मुलीने दिलेला आहे. आईसही दोघींनाही पोलिसांनी गजाआड केले होते. (प्रतिनिधी)