गोवा: विमान दुर्घटनेतील बेपत्ता अधिका-यांचे मृतदेह सापडले
By Admin | Updated: March 27, 2015 13:42 IST2015-03-27T13:39:07+5:302015-03-27T13:42:52+5:30
गोव्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या डॉर्निअर विमान अपघातात बेपत्ता असलेल्या दोन्ही अधिका-यांचे मृतदेह सापडले आहेत.

गोवा: विमान दुर्घटनेतील बेपत्ता अधिका-यांचे मृतदेह सापडले
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २७ - गोव्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या डॉर्निअर विमान अपघातात बेपत्ता असलेल्या दोन्ही अधिका-यांचे मृतदेह सापडले आहेत. लेफ्टनंट अभिनव नागोरी यांचा मृतदेह आज सापडला असून सहायक पायलट लेफ्टनंट किरण शेखावत या महिला अधिका-याचा मृतदेह गुरूवारी रात्री सापडला. या विमानातील आणखी एक अधिकारी निखिल जोशी अपघातातून बचावले असून त्यांच्यावर उचार सुरू आहेत.
हिंदुस्तान एरॉनोटिक लिमिटेडच्या डॉर्नियर विमानाला कारवारपासून १० सागरी मैलावर अरबी समुद्रात अपघात झाला होता. सराव सुरू असताना या विमानाचा तळाशी संपर्क तुटला होता. त्यावेळी विमानात तीन जण होते. विमान समुद्रात कोसळल्यानंतर मच्छिमारांनी जोशी यांना वाचवले होते मात्र अभिनव नागोरी व किरण शेखावत हे दोघे बेपत्ता होते. अखेर त्या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.