शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Goa Exit Poll: गोव्यात वेगवान हालचाली, प्रमोद सावंत दिल्लीत; संध्याकाळी फडणवीसांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 14:43 IST

देशात प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्याचा कल भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याचा दिसून आला आहे

मुंबई - देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले असून युपीत भाजपचीच सरशी दिसत आहे. तर, महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या गोव्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच रंगले होते. भाजपा, काँग्रेस आणि मगोप या प्रस्थापित पक्षांसोबत तृणमूल काँग्रेस, आप आणि स्थानिक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गोव्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे, यावेळी गोव्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी गोव्यात चर्चा होती. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती दिसून येत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आहेत. 

देशात प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्याचा कल भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याचा दिसून आला आहे. एक दोन अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलनी गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना २०१७ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, प्रमोद सावंत आज तातडीने मोदींच्या भेटीला जात आहेत. 'गोव्यात जास्तीत जास्त जागांसह भाजपचं सरकार स्थापन करणार आहे. पुन्हा एकदा गोव्याची जबाबदारी माझ्याकडेच दिली जोईल. भाजप जे सांगते, ते निश्चितच आचरणात आणते,' असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रमोद सावंत हे आज दिल्लीत पीएम मोदींची भेटीला असून भाजप अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी मोदींना सांगितल्याचं समजते. विशेष म्हणजे यासंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेणार आहेत.    भाजपला गोव्यात 20 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, अनेक एक्झिट पोलची आकडेवारी तशीच सांगत आहे. आम्ही अपक्ष आमदार आणि प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन करू. आम्ही एमजीपीला पाठिंबा मागत आहोत. केंद्रीय नेतृत्व या पक्षांसोबत वाटाघाटी किंवा त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करेल, असेही प्रमोद सावंत यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे. 

काय सांगताहेत एक्झिट पोल

गोव्याबाबत टीव्ही नाईन भारतवर्ष-पोलस्ट्रेटने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला १७ ते १९ जा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ११ ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये आपला १-४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना २-७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये भाजपाला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष ४ जागा जिंकू शकतो. तर इतर पक्षांना ६ जागा मिळू शकतात.

दरम्यान, गोव्याबाबत इंडिया टीव्ही-ग्राऊंड झीरोने मात्र गोव्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या एक्झिट पोलनुसार गोव्यात भाजपाला १०-ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोप आघाडीला ३-५ तर इतरांना १ ते ४ जागा मिळू शकतात  

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२