शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:27 IST

सुदीन ढवळीकर यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी

गोवा विधानसभेचा यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीशिवाय मांडण्याचा निर्णय सोमवारी भाजपा नेत्यांकडून घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मनोहर पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगत मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. ते येत्या 22 फेब्रुवारीला विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडतील. त्यानंतर ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतील, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांची प्रकृती सुधारत असली तरी ते आजारातून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यामुळेच भाजपा नेत्यांच्या आजच्या बैठकीत पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणखी चार दिवस चालणार आहे. या काळात सार्वजानिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर सभागृह नेतेपदाची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती भाजपा नेत्यांकडून देण्यात आली. दरम्यानच्या काळात पर्रीकर यांच्या स्वादूपिंडाला (पॅनक्रिया) सूज आल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आले. परंतु लिलावती इस्पितळाने यावर अधिकृतरित्या कोणतेच भाष्य केलेले नाही किंवा पत्रक जारी केले नव्हते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी  मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमानंतर पर्रिकर यांना भेटायला लीलावती रुग्णालयात गेले होते. तत्पूर्वी पर्रीकर यांची गोव्यातील काही मंत्र्यांनी, भाजपा पदाधिका-यांनी मुंबईत भेट घेतली आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत हे पाटणा येथे होते. दूरध्वनीवरून शनिवारी मुख्यमंत्री सभापती सावंत यांच्याशी बोलले. अर्थसंकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. त्याविषयी दूरध्वनीवरून काही वरिष्ठ प्रशासकीय अधिका:यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाgoaगोवा