शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:04 IST

Vande Bharat Express: देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली. 

बंगळुरू : देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर हाेणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या माॅडेलची झलक दाखविली. 

बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात ही ट्रेन तयार करण्यात आली असून वैष्णव यांनी नव्या रेल्वेची पाहणी केली. झाली असून काही दिवसांमध्ये ती कारखान्यातून बाहेर आणली जाईल. सुरुवातीला १० दिवस गाडीची कठाेर अंतर्गत चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दाेन महिने या गाडीची रूळांवर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर ही गाडी लाॅंच करण्यात  येणार आहे.

- ८००-१,२०० किलाेमीटर अंतरावरील प्रवासासाठी ‘स्लीपर वंदे भारत’ तयार केली आहे.- रात्री १० वाजण्याच्या आसपास प्रवासी ट्रेनमध्ये बसतील आणि सकाळी गंतव्यस्थळी पाेहाेचेल.- मध्यमवर्गीयांना विचारात घेऊन गाडी बनविली असून राजधानी एक्स्प्रेसएवढे भाडे राहील. 

काय आहे या नव्या गाडीत खास...nनव्या गाडीत संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. nत्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी येईल.nनवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबुती वाढते. nट्रेनचे डबे आणि शाैचालय अपग्रेड करण्यात आले आहे. nयाशिवाय ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत.nदेखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविली आहे. 

अशी असेल गाडीची रचनाn१६ डब्यांची असेल स्लीपर वंदे भारतn१ एसी प्रथम श्रेणी - २४ बर्थn४ एसी द्वितीय श्रेणी - १८८ बर्थn११ एसी तृतीय श्रेणी - ६११ बर्थnताशी १८० किमी सर्वाेच्च वेगnताशी १६० किमी कमाल वेग मर्यादाnराजधानी एक्स्प्रेसपेक्षा वेगवान प्रवास 

या आहेत सुविधाnसीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची साेय.nमाॅड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही.nएसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शाॅवर.nवरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना.nसामान ठेवण्यासाठी जास्त जागा.nदिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असेल.nऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा.nलाेकाे पायलटसाठी शाैचालयnकमी झटके बसणार.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे