बकोरीला जा, पण खड्ड्यातून

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

लोणीकंद : पुणे-नगर हायवेलगत बकोरी फाटा ते बकोरी गाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Go to bakorila, but from the ditch | बकोरीला जा, पण खड्ड्यातून

बकोरीला जा, पण खड्ड्यातून

णीकंद : पुणे-नगर हायवेलगत बकोरी फाटा ते बकोरी गाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या रस्त्याचे काम ग्रामसडक योजनेतून अर्धवट झाले आहे. झालेले काम निकृष्ट आहे. रस्त्याची रुंदी सहा मीटर असून, या कामाची ५ वर्षे हमी असते. परंतु हा रस्ता दोन वर्षांतच खराब झाला आहे. तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती झाली तरीही अनेक ठिकाणी खडी वर आली आहे. साईड प˜्याही निकामी झाल्या आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी माहिती अधिकारात या रस्त्याबाबत माहिती मागितली, तेव्हा, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील हा गैरकारभार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे उपअभियंता यांच्याकडेही रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले आहे.
चौकट..............
बकोरीगाव शहरालगत असल्याने या मार्गावर बीजीएस कॉलेज, रामचंद्र कॉलेज, जेएसपीएम विद्यालय तसेच अंध-अपंग विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल आहे. सुमारे ५० ओनरशिप स्किमची कामे सुरू आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

फोटो..........
बकोरी रस्ता उखडल्याचे दिसत आहे.

Web Title: Go to bakorila, but from the ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.