इबोलाची साथ जागतिक आणीबाणी
By Admin | Updated: August 9, 2014 01:16 IST2014-08-09T01:16:35+5:302014-08-09T01:16:35+5:30
पश्चिम आफ्रिकेत पसरलेली ‘इबोला’ची साथ आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संकट असून,ही साथ रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे,

इबोलाची साथ जागतिक आणीबाणी
>लंडन : पश्चिम आफ्रिकेत पसरलेली ‘इबोला’ची साथ आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संकट असून,ही साथ रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आणीबाणी घोषित केली आहे.
इबोलाची ही आजवरची सर्वाधिक मोठी साथ असून इबोला विषाणूंमुळे होणा:या मृत्यूचा दर 5क् टक्के आहे. आजवर या भयानक जीवघेण्या साथीने 932 लोकांचा बळी घेतला आहे. 2क्क्9 मध्येही जागतिक आरोग्य संघटनेने स्वाईन फ्लूची साथ रोखण्यासाठी आणि मेमध्ये पोलिओसाठी अशाच प्रकारची आणीबाणी घोषित केली होती.
आंतरराष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने ही घोषणा करण्यात आली आहे. तथापि, अनेक देशांत इबोलाचा प्रादुर्भाव झालेला नसेलही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉ. मार्गारेट चॅन यांनी स्पष्ट केले.
ज्या देशांत इबोलाची साथ पसरली आहे, त्या देशांना ही साथ रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने पुढाकार करून मदत करावी.
असे आवाहनही त्यांनी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत केले.
इबोलाची लागण गिनीत मार्चपासून झाली. त्यानंतर सिएरा लिओन आणि लायबेरिया ही साथ पसरली. इबोलावर उपचारासाठी लस नाही.
जागतिक आरोग्य संघटना या साथीच्या पाश्र्वभूमीवर प्रवासावर प्रतिबंध घालण्याची शिफारस करणार नाही; परंतु इबोला विषाणूग्रस्तांनी आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.